स्थानिक हरिकिसन जाजू एज्युकेशन संस्था यवतमाळ संचालित कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड कॉम्प्युटर सायन्स, यवतमाळ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्य राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाकरीता महाविद्यालायचे प्र. प्राचार्य प्रा. रितेश चांडक, बिसीए विभाग प्रमुख प्रा. निलेश भोयर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. महाविद्यालयाचे विद्यार्थी, रासेयो स्वयंसेवक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश पाटील यांनी केले. राष्ट्रीय एकता आज महत्वाची ठरलेली आहे, देशाचा किंवा आपला विकास घडवायचा असेल त्यासाठी आपणास सत्यनिष्ठ भावनेतून तसेच संकल्पनेतून आपल्याला विकास घडवता येईल व हा संदेश इतरांपर्यंत पोहचवता येऊ शकतो हाच या मागचा हेतू आहे. असा संदेश पाहुणे प्रा. निलेश भोयर यांनी दिला. त्याकरिता महाविद्यालयामध्ये एकता शपथ कार्यक्रम आयोजित केला व प्रत्येक व्यक्तीने एकता शपथ घेतली. संस्था अध्यक्ष श्री. प्रकाशजी जाजू व सचिव श्री. आशिषजी जाजू यांनी सर्वाना एकता दिवसा करीता शुभेच्छा दिल्या व आपले आभार व्यक्त केले.

 

0
0
0
s2smodern