महिला दिन कार्यक्रम

महिला सक्षमीकरण आणि महिलांचा सन्मान 

प्रमुख पाहुणे - कु. विजया पंधरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक, महिला सेल आणि दामिनी पथक 

 

दिनांक ९ मार्च २०१९ रोजी महाविद्यालयामध्ये,  ८ मार्च म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे - कु. विजया पंधरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक, महिला सेल आणि दामिनी पथक यांना आमंत्रित केले. या कार्यक्रमा मध्ये अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रितेश चांडक आणि महाविद्यालयीन महिला समितीच्या अध्यक्षा सौ. सारिका सुळके हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी शहरामध्ये होत असलेल्या महिलांच्या अत्याचारावर काही उदाहरणे दिले तसेच त्यांनी दामिनी पथकाची कामगिरी शहरात कश्या प्रकारे आहे यामध्ये मुलीना योग्य ते मार्गदर्शन व्हावे व चित्रफित दाखवून त्यांनी वेग वेगळ्या मुद्यांचे चित्रीकरण विद्यार्थ्यांना दाखविले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय, महिला समिती, विद्यार्थी कल्याण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सयुंक्त विद्यमाने घेण्यात आला होता.

 

 

0
0
0
s2smodern