*तंबाखू व्यसनमुक्ती सामूहिक शपथ कार्यक्रम* 

 

आज या भारत देशात हजारांहून अधिक लोक कँसर सारख्या रोगानी ग्रासलेले आहेत, आणि अजून भिन्न रोग व्याधी त्यांना आहेत ती फक्त तंबाखू किंवा त्यापासून बनलेल्या उत्पादनाच्या सेवनाने. याच अनुषंगाने हरिकीसन जाजू एज्युकेशन संस्था यवतमाळ येथील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने महाविद्यालयात  दिनांक ११ जुलै रोजी सकाळी १०:३० ला *तंबाखू व्यसनमुक्ती करिता सामूहिक शपथ कार्यक्रमाचे आयोजन* करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री . प्रकाशजी जाजू , सचिव श्री. आशिषजी जाजू , आणि महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य श्री. रितेश चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत , महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख, उपस्थित विद्यार्थी, रासेयो स्वयंसेवक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी,  यांनी या शपथ कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. आणि शपथ घेतली की , मी माझ्या आयुष्यात कधीही तंबाखू जन्य उत्पादनाचे सेवन करणार नाही तसेच कोणालाही त्या तंबाखू जन्य उत्पादनाचे सेवन करू देणार नाही.

 

या कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे संचलन प्रा. अमोल काळेकर, तर आभार प्रा. नितीन राऊत यांनी केले.

 

0
0
0
s2smodern