आज राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या अंतर्गत युवा माहिती दूत कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमा करीता अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते श्री सुरज भाकरे यांनी युवा माहिती दूत या विषयाचे मार्गदर्शन केले . शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या सामान्य जनते पर्यंत पोहचू शकत नाही या योजनांचा लाभ त्यांना भेटावा म्हणून युवकांच्या माध्यमातून त्या जनते पर्यंत पोहचतील या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमामध्ये उपस्थितबअसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १७२ विद्यार्थ्यांनी युवा माहिती दूत अँड्रॉइड ऐप डाउनलोड केले आणि त्यामध्ये असलेल्या योजना आणि त्याचा तपशील विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांनी समजवून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी त्या योजना लोकांपर्यंत पोहचवीन्याचे काम चालू केले. यात आजच्या आज १२४ लोकांपर्यंत माहिती पोहचविण्याचे कार्य जलद गतीने केले म्हणून महाराष्ट्र शासना चे मुख्यमंत्री साहेबांच्या स्वाक्षरी असलेले  प्रमाणपत्र मिळाले तो आहे बि. सी. ए. भाग २ चा तेजस वाटेकर तर बिसीए भाग ३ ची कु. सृष्टी अरगुलवार हिने ५१ लोकांपर्यंत माहिती पोहचविण्याचे काम केले . या कार्यक्रमामध्ये प्रभारी प्राचार्य रितेश चांडक आणि प्रा. उमेश कानतोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश पाटील यांनी केले.

0
0
0
s2smodern