राष्ट्रीय सेवा योजना पथकाने केला डॉक्टर्स डे आणि सनदी लेखापाल दिवस साजरा 

 

आपल्या जीवनात डॉक्टर हा सर्वात मोठा घटक आहे ज्याला आपण देवच मानतो, कारण डॉक्टर हा आपले प्राण वाचवितो तसेच उपचार करून आपली प्रकृती पण व्यवस्थित ठेवण्याचे काम करतो, म्हणून डॉक्टर हे आपल्या साठी देवा पेक्षा कमी नाही . याच भावनेतून हरिकीसन जाजू एज्युकेशन संस्था यवतमाळ येथील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांनी दिनांक १ जुलै रोजी यवतमाळ शहारातील डॉक्टरांचा त्यांच्या कार्या साठी सत्कार करण्याचा अभिनव प्रकल्प केला यामध्ये डॉ. अमर काबरा, डॉ. शितल काबरा, आणि डॉ. स्वप्नील मानकर यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला . 

      तसेच आज सनदी लेखापाल दिवस असल्या मुळे सि. ए. आशिष कलंत्री यांचा पण सत्कार केला , कारण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सनदी लेखापाल यांचाही काहींना काही वाटा असतो. 

या कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश पाटील आणि सह कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन राऊत यांनी केले, या कार्यक्रमा करीता रासेयो स्वयंसेवक आणि स्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे अध्यक्ष श्री . प्रकाशजी जाजू , सचिव श्री. आशिषजी जाजू , आणि महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य श्री. रितेश चांडक यांनी शुभेच्छा दिल्या.

 

 

0
0
0
s2smodern